अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगासन (पुरुष व महिला) स्पर्धेकरीता विद्यापीठाची चमू घोषित

कलिंगा इन्स्टिट¬ुट ऑफ इन्डस्ट्रियल टेक्नॉलॉजी, भुवने·ार (ओरिसा) येथे 24 ते 28 डिसेंबर, 2024 दरम्यान होणा-या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ योगासन (पुरुष व महिला) स्पर्धेकरीता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संघाची चमू घोषित करण्यात आली आहे.
पुरुष संघ
चमूमध्ये श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा यश राठी, नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंतचा नितीन राठोड व वि·ाजित इंगोले, श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावतीचा सुरज वैद्य व बिट्टू कुमार साव, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा करण भालेराव, दर्शन जाधव, सर्वेश डांगे व राज काकडे
महिला संघ
महिला संघामध्ये नेहरू महाविद्यालय, नेरपरसोपंतची कु. प्रतिक्षा तुपट, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीची कु. आस्था जोंधळेकर, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीची कु. समीक्षा कडू, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीची कु. चेतना देशमुख व आयुषी पांडे, श्रीमती आर.डी.जी. महिला महाविद्यालय, अकोलाची कु. अनिता चव्हाण व कु. प्रेरणा डोंगरे, जे.डी. पाटील महाविद्यालय, दर्यापूरची कु. श्रावणी चव्हाण आणि प्रो. राम मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड मॅनेजमेंटची कु. कोमल सुलताने यांचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे व कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे.
पुरुष व महिला संघाचा प्रशिक्षण वर्ग डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावती येथे दि. 12 ते 21 डिसेंबर दरम्यान होणार आहे. प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.