मनपात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन

अमरावती : मंगळवार दिनांक २६ नोव्हेंबर,२०२४ रोजी संविधान दिवसा निमित्ताने भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन अमरावती महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे सकाळी ११.०० वाजता महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस यावेळी हारार्पण करण्यात आले. २६ नोव्हेंबर च्या हल्ल्यात शहीद झालेल्या बांधवांना यावेळी श्रध्दांजली देण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त डॉ.मेघना वासनकर, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त योगेश पिठे, उपायुक्त श्यामसुंदर देव, मुख्यलेखापाल दत्तात्रय फिस्के, शहर अभियंता ईश्वरानंद पनपालिया, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, कार्यालय अधिक्षक नंदकिशोर पवार, उद्यान अधिक्षक श्रीकांत गिरी, मालमत्ता अधिकारी दिपक खडेकार, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कोवे, सहाय्यक प्रकल्प संचालक वंदना गुल्हाणे, सहाय्यक निवडणूक अधिकारी अक्षय निलंगे, महानगरपालिका संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल, उपअभियंता जयंत काळमेघ, राजेश आगरकर, शहरी आरोग्य अभियान कार्यक्रम व्यवस्थापक वर्षा गुहे, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, विजय आवारे, शिवा फुटाणे, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.