किसन मदने यांना सेवानिवृत्ती निरोप

अमरावती : सार्वजनिक आरोग्य विभागील आरोग्य निरीक्षक किसन मदने यांना सेवानिवृत्ती निरोप देण्यात आला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या दालनात त्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
किसन मदने यांची प्रथम नियुक्ती 1994 मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील कोर्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. त्यानंतर 31 वर्षे आरोग्य सेवेचा कार्यकाळ संपवून अमरावती येथून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त एकाच दिवशी तीन ठिकाणी सत्कार समारंभ घेण्यात आला.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या दालनातील कार्यक्रमाला डॉ. विशाल काळे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. निगार खान, डॉ. मुंदडा, डॉ. रुपेश खडसे, साथरोग अधिकारी डॉ. तरोडेकर, सेवानिवृत्त जिल्हा हिवताप अधिकारी श्रीमती डॉ. आत्राम, श्रीमती डॉ. बारसे, श्रीमती डॉ. गुहे, श्रीमती डॉ. कल्पना, आरोग्य निरीक्षक हैदर अली उपस्थित होते.
बबन खंडारे यांनी स्वागत गीत गाऊन स्वागत केले. त्यानंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, स्त्री वैद्यकीय अधिकारी डॉ. निघार खान आणि डॉ. मुंदडा यांनी शाल, श्रीफळ देऊन श्री. मदने यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. काळे यांनी श्री. मदने यांच्या निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितानीही मनोगत व्यक्त केले.
किसन मदने यांनी कार्यक्षेत्रामध्ये उद्भवणाऱ्या अडचणी, आलेले अनुभव व्यक्त केले. आरोग्य सेवक डी. एम. बरडे यांनी सूत्रसंचालन केले. बबन खंडारे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला शहरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि आशाताई उपस्थित होत्या.