LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

डाॅ. अनिल बोंडे यांची जेएनयूच्या कोर्ट समितीवर नियुक्ती उपराष्ट्रपतीकडून अधिसूचना जारी : अमरावतीला मोठा बहूमान

अमरावती –  गुणवत्तापुर्ण शिक्षणात देशात अग्रेसर असलेले नवी दिल्ली येथील देशातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ असलेल्या जवाहरलाल नेहरू (JNU)  विद्यापीठाच्या  कोर्ट समितीवर देशातील भाजपच्या तीन खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य डाॅ.अनिल बोंडे यांची या समितीवर वर्णी लागली आहे. तशी अधिसूचना देखिल उपराष्ट्रपती महोदयांकडून काढण्यात आली आहे. बोंडेंच्या निमित्ताने अमरावतीला हा मोठा बहूमान मिळाला आहे.

       नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हे देशातील प्रथम क्रमांकाचे विद्यापीठ आहे. जेएनयूमध्ये शिक्षण घ्यावे हे प्रत्येक भारतीय विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. त्याच विद्यापीठाच्या कोर्ट समितीवर भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार डाँ.अनिल बोंडे यांची उपराष्ट्रपती जगदिप धनकड यांनी नियुक्ती केली आहे. देशातील तीन खासदारांची नियुक्ती या कोर्ट समितीवर केंद्र सरकारने केली आहे. त्यामध्ये के.लक्ष्मण, समिरसिंह सोलंके या दोघांचा समावेश आहे. अनिल बोंडे यांची या समितीवर नियुक्ती झाल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी  त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
___`
ही जबाबदारी असते कोर्ट समितीकडे?
जेएनयूचे वार्षिक अहवाल व लेखे तयार करणे, लेखापरिक्षण अहवाल, जेएनयूच्या बजेटवर चर्चा करणे तसेच विद्यापीठाची सर्वोच्च असलेली कार्यकारी परिषद, शैक्षणिक परिषदेच्या कृतीचे अवलोकन करण्याचे अधिकारी या न्यायिक समितीला आहेत.

____
सर्वसमावेशक कार्याची उपराष्ट्रपतीकडून नोंद

डॉ.अनिल बोंडे हे राजकारणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत होते. औषध वैद्यक शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या अनिल बोंडे यांनी अनेक ठिकाणी अध्यापनाचे कार्य केले. शिक्षण, संशोधन तसेच वैद्यकीय क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून आणण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. रुग्ण सेवा आणि रुग्ण कल्याणाच्या चळवळीतही त्यांचे उल्लेखनीय योगदान आहे. याच सर्वसमावेशक सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी ही नियुक्ती करताना लक्षात घेतली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!