एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून बाहेर

एकनाथ शिंदे सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळत आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या शर्यतीत एकनाथ शिंदे यांचही नाव आहे. निकालानंतर सत्ता स्थापने संदर्भात बऱ्याच चर्चांना उधाण आलं होतं. या सर्व चर्चांना उत्तर देण्यासाठी, एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री हा महायुतीचा असेल, कुण्या एका पक्षाचा नाही. मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी बोललो, मी त्यांच्या निर्णयासोबत असेल अस त्यांना सांगितलं, तसेच मला अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो, लाडका भाऊ म्हणून माझी नवीन ओळख निर्माण झाली आहे, मी त्याने खुश आहे. जीवन मे असली उडान बाकी है, अभी तो नापि है थोडी सी जमी, अभी पुरा आसमान बाकी है.. असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आता सत्ता स्थापनेसाठी कुठल्याही स्पीड ब्रेकर नाही, वरिष्ठांच्या निर्णयाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे असही ते यावेळी म्हणाले. त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतून बाहेर, असं म्हणता येईल…