Crime NewsLatest NewsMaharashtra
एटीएम फोडून २३ लाख लांबविले; बार्शी शहरात धाडसी चोरी

थंडीचे दिवस असल्याने शहरातील प्रमुख रस्त्यांसह कॉलन्यांमधील रात्री दहानंतर वर्दळ कमी झालेली आहे. याचा फायदा चोरटे घेत असून बार्शी शहरात मध्यरात्रीच्या सुमारास एटीएम फोडून तब्बल २३ लाख रुपयांची रक्कम लांबविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.
सोलापूरच्या बार्शी शहरातील मुख्य रस्त्यावर हि घटना घडल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान बार्शी शहरातील परांडा रोडवर स्टेट बँकेचे एटीएम आहे. चोरट्यानी हे एटीएम लक्ष केले असून शटर तोडून एटीएम मशीन फोडत यातील रक्कम लांबविली आहे. थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावर शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे. याचा फायदा चोरटे घेत आहेत.