३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागृती रॅलीचं आयोजन

३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभागाच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली विविध दिव्यांग शाळांनी रॅलीमध्ये सहभाग घेतलाजिल्हाधिकारी कार्यालय चौक येथून रॅलीला सुरवात करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज, डॉ आंबेडकर यांच्यासह सह अनेक महापुरुषांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनि सहभाग , घेतला इर्विन चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला
जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती कार्यालय,व अमरावती शहरातील दिव्यंगांच्या विशेष शाळा व कार्यशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग जनजागृती रॅलीचं आयोजन ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्य करण्यात आलं जिल्हा परिषद येथून जिल्हाधिकारी सौरभ कटियार , मुख्यकार्यकारि अधिकारी संजिता मोहपात्रा यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात झाली.
मनपा आयुक्त सचिन कलंत्रे समाज कल्याण विभागाचे उपायुक्त सुनील वारे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती . रॅलीत विविध संदेश देणारे देखावे समाविष्ट होते अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषधेत दिव्यांग विदयार्थी तर हातात संविधान घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह महात्मा फुले सावित्री बाई अशा अनेक महापुरुषांच्या वेशभूशा दिव्यांग विद्यार्थ्यांनी घेतल्या रॅली मध्ये डॉ नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालय अंध कर्मशाळा , बुलीदान मूकबधिर विद्यालय नूतन मूकबधिर विद्यालय असिसी आशादीप मतिमंद विद्यालय ,दौलतभाई देसाई मतिमंद विद्यालय अशा अनेक शाळेने सहभाग घेतला होता ,, रॅलीत जिल्हा जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी डी एम पुंड , सह्हायक सल्लागार पुरुषोत्तम शिंदे पंकज मुद्गल , जीवन गोरे आदीं सहभागी झाले