जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तोडगा काढला…

राज्यात मुख्यमंत्री कोण होणार? कोणाला मंत्रीपद मिळणार याची उत्सुकता व मुंबईच्या आझाद मैदानावर शपथविधीची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र अमरावती मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल होत आहे, रात्री कडाक्याच्या थंडीत विद्यार्थी आपल्या मागण्यासाठी लॉंग मार्च करत धारणी येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर पायदळ निघाले होते मात्र दुपारी यावर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने तोडगा काढला व विद्यार्थी माघारी परतले मात्र ही वेळ विद्यार्थ्यावर का आली हा प्रश्न उपस्थित होतो,अमरावती शहरात आदिवासी वस्तीगृहात शिक्षण घेत असलेल्या मेळघाटसह पश्चिम विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्याकडे लक्ष वेधन्यासाठी रात्री शेकडो विद्यार्थी पायदळ लॉंग मार्च करत 150 किलोमीटर धारनी येथील प्रकल्प कार्यालयात पायदळ निघाले होते मात्र रात्री उशिरा पोलिसांनी यात मध्यस्थी केली ४ डिसेम्बरला दुपारी निवासी जिल्हाधिकारी अनिल भटकर व तहसीलदार विजय लोखंडे यांच्यासोबत बैठक झाली बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी आपल आंदोलन मागे घेतलं मात्र रात्री कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांना लॉन्ग मार्च करण्यात वेळ आल्याने विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागला