
उत्तर प्रदेशातील मथुरामधून एक विचित्र आणि धार्मिक भावनांना दुखवणारं प्रकरण समोर आलंय. भगवान श्रीकृष्णाची जात जाट असल्याचं कान्हा नगरीत सर्व भिंतीवर लिहिलंय. कुमार साहेब सिंह नावाच्या व्यक्तीने घराच्या भिंतींवर श्रीकृष्णाबद्दल अशा गोष्टी लिहिल्या होत्या. यावरून बराच गदारोळ झाला होता. स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुमार साहेब सिंह नावाच्या व्यक्तीने नांद गावातील घरांच्या भिंतींवर श्रीकृष्णाशी संबंधित काही वादग्रस्त गोष्टी लिहून ठेवल्या होत्या. ज्यामध्ये तो जाट जातीचा असल्याचे वर्णन करण्यात आले होते. तेव्हापासून नांद गावात वाद पसरला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि भिंतींवर लिहिलेल्या कमेंट्स काढून टाकल्या.
नांदगाव आणि बरसाणा परिसरातील या घटनेनंतर तणावपूर्ण वातावरण आहे. कारण या भागात राधा आणि कृष्णाच्या भक्तिला खूप महत्त्व आहे. या ठिकाणी राहणारी लोक याला आपला धार्मिक वारसा मानतात. असं असतानाही कुमार साहेब सिंह यांनी नांदगावचा इतिहास भिंतींवर लिहिला. ज्यामध्ये श्रीकृष्णाला जाट कुळाशी जोडले गेलं होतं. याला खोटे आणि फुटीरतावादी म्हणत, एका स्थानिक रहिवाशाने असा आरोप केला की अशा प्रकारचे वक्तव्य जातीय द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उपजिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून नगर पंचायतीने एफआयआर दाखल करण्यात आलीय. त्यावर पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक अरविंद कुमार निर्वाल म्हणाले की, कुमार साहेब सिंह नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. भिंतींवर लिहिलेल्या वादग्रस्त कमेंट्स पुसून टाकण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
यापूर्वीही अनेकदा अशी प्रकरणे समोर काही स्थानिक लोकांनी सांगितलंय. हिंदू देवी-देवतांना जातींशी जोडले गेले आहे. त्याचप्रमाणे, एकदा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमानाचे वर्णन दलित जात असे केलं होतं. तेव्हाही या प्रकरणाने बरंच लक्ष वेधलं होतं. ज्याचा उपयोग इतर पक्षांनी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी केला होता.