अमरावतीत हेल्मेट सख्ती
दुचाकीस्वारांना अमरावती शहर पोलिसांनी हेल्मेट सक्ती केली आहे दुचाकी चालवणाऱ्या चालकाला व दुचाकी वर मागे बसणाऱ्या या दोघांनाही हेल्मेट घालावंच लागणार आहे सुरुवातीला अमरावती शहर पोलिसांनी रस्त्यावर येत दुचाकी चालकांना हेल्मेट बाबत जनजागृती मोहीम सुरू केली आहे त्यानंतर मात्र हेल्मेट न घातल्यास कारवाई केली जाणार आहे
अमरावती शहरामध्ये हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकी स्वारांवर दंडात्मक व कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे, दिवसभर अमरावती शहरात पोलीस ठिकठिकाणी या मोहिमेसाठी सज्ज आहेत त्यामुळे आता दुचाकी चालवताना दोघांनी हेल्मेट घालायचा आहे नाहीतर कारवाईला समोर जा असा इशारा पोलीस उपायुक्त कल्पना बारवकर यांनी दिला आहे …. अपघात झाल्यास हेल्मेटमुळे डोक्याचं संरक्षण होतं अपघातात डोक्याला मार लागल्याने अनेकांचे प्राण गेलेले आहेत तेव्हा हेल्मेट वरून स्वतःला सुरक्षित करावं असं पोलिसांचं म्हणणं आहे