भारत vs ऑस्ट्रेलिया दूसरा टेस्ट :-विराट ७, रोहित ३; भारताचा निम्मा संघ तंबूत; गुलाबी कसोटीत टीम इंडिया अडचणीत

ऑस्ट्रेलिच्या मैदानावर बॉर्डर- गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. हा सामना डे- नाईट कसोटी सामना आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय भारतीय संघाला सार्थ ठरवता आलेला नाही. भारतीय संघाला एकापाठोपाठ एक ५ मोठे धक्के बसले आहेत.
पिंक बॉल कसोटीत रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माने स्वत: सलामीला न जाता केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालला सलामीला जाण्याची संधी दिली.
मात्र स्टार्कने सामन्यातील पहिल्याच चेंडूवर यशस्वी जयस्वालला पायजित करत माघारी धाडलं. जयस्वाल बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून ६९ धावांची भागीदारी केली. मात्र ही भागीदारी आणखी पुढे जाऊ शकली नाही. केएल राहुल ३७ धावा करत माघारी परतला.
केएल राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. गेल्या सामन्यात शतकी खेळी करणारा, विराट कोहली या सामन्यातही मोठी खेळी करेल, असं वाटलं होतं. मात्र तो अवघ्या ७ धावा करत माघारी परतला.
केएल राहुल बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. गेल्या सामन्यात शतकी खेळी करणारा, विराट कोहली या सामन्यातही मोठी खेळी करेल, असं वाटलं होतं. मात्र तो अवघ्या ७ धावा करत माघारी परतला.
या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:-
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), नितीश रेड्डी, रविचंद्रन अश्विन, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.