विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही ? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन ; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढे

3 डिसेंबर रोजी विनोद कांबळी त्याचा जिवलग मित्र सचिन तेंडुलकरची खूप वेळानंतर भेट झाली. याभेटीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला. पण त्या व्हिडीओमध्ये कांबळीची अवस्था पाहून सगळ्यांचेच हळहळले. जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा सुरुवातीला काही सेकंद विनोद कांबळी मास्टर ब्लास्टर सचिनला ओळखूही शकला नाही. या भेटीमुळे सगळ्यांना प्रश्न पडला आहे की, विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही ? विनोद कांबळीला काय झालं आहे ?
विनोद कांबळी नाही पूर्णपणे तंदुरुस्त
विनोद कांबळी सध्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तंदुरुस्त नाहीत. कांबळीच्या निकटवर्तीय असलेल्या मार्कस कौटो यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अंपायरिंग केले आहे. त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, ” त्याच्या अनेक समस्या आहेत आणि पुनर्वसन केंद्रात जाण्यात काही अर्थ नाही. कांबळी यापूर्वी 14 वेळा पुनर्वसन केंद्रात गेला आहे. आम्ही त्याला तीन वेळा वसईतील पुनर्वसन केंद्रात नेले आहे.” विनोद कांबळी काही काळापूर्वी अमली पदार्थांच्या व्यसनाशी झुंजत असल्याचे समोर आले होते.
हे ही वाचा: हृदयद्रावक! ८ दिवसांवर लग्न पण काळाने घात केला; कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्याचे अचानक निधन
माझी कर्णधार मदतीसाठी पुढे आले
माजी विश्वचषक चॅम्पियन कर्णधार कपिल देव यांनी काही मानसिक समस्यांशी झुंजत असलेल्या कांबळीला आर्थिक मदत करण्याचा हात पुढे केला आहे. माजी वेगवान गोलंदाज बलविंदर सिंग संधू म्हणाले, ” कपिल देव यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितले की, जर त्यांना पुनर्वसनासाठी जायचे असेल तर आम्ही त्यांना आर्थिक मदत करण्यास तयार आहोत. उपचार कितीही वेळ चालला तरी चालेल.”
मित्रांपासून दुरावला विनोद कांबळी
विनोद कांबळी काही वर्षांपूर्वीपर्यंत पूर्णपणे तंदुरुस्त होता. सचिनसोबतच्या ६६४ धावांच्या भागीदारीची त्याने सोशल मीडियावर अनेकदा चर्चा केली. पण त्याच्या ड्रग्जच्या व्यसनामुळे तो त्याच्या सहकारी क्रिकेटर्सपासून दूर गेला. आता कांबळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आजरी असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा बाईकसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये कांबळी लडकडत चालताना दिसत होता.