५६ वर्षीय प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याला लाच घेतांना रंगेहात अटक

५५ वर्षीय तक्रारदाराने छत्रपती सम्भाजी नगर येथे लाच मागितल्याची तक्रार केली तक्रारदार यांची सीमा तपासणी नाका नवापूर येथे नियुक्तीचा म्हणून मोबदला म्हणून ३ लाखांची लाच मागितली त्याच्या तक्रारीवरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी अमोल धस सापळा सहाय्य्क अधिकारी सुरेश नाईकनवरे यांनी कारवाई करून ५६ वर्षीय प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक अण्णा पाटील. खासगी इसम ५२ वर्षीय भिकन मुकुंद भावे या दोघांना ३ लाखांची लाच घेताना रंगेहात अटक केलीय . मेहरुन तलावा जवळ असलेल्या लेक होम अपार्टमेंट जळगाव येथे हि कारवाई करण्यात आली . पोलीस स्टेशन एमआय डीसी जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय अशोक नागरगोजे,युवराज हिवाळे,विलास चव्हाण, सचिन बारसे, सी एन बागुल आदींनी हि कारवाई केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आवाहन केलाय कि कोणत्याही शासकीय किंवा खासगी इसमाने लाचेची मागणी केल्यास विभागाशी सम्पर्क साधावा