महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसकडून अस्थिकलश बाईक रॅलीचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसकडून अस्थिकलश बाईक रॅलीचे आयोजन..करण्यात आलं अमरावती शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून हि रॅली निघाली रॅलीमध्ये काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे, कर्नाटक येथील आमदार प्रदीप ईश्वरसह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी.. झाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बाबासाहेबांचे अस्थिकलश असलेल्या नया अकोला पर्यंत रॅलीचे आयोजन..करण्यात आलं रॅलीनंतर न्या अकोला येथे सभा घेण्यात आली . माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित केलं
महा परिनिर्वान दिनानिमित्त माजी आ. ॲड.यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने ६ डिसेंबर रोजीअभिवादन यात्रा काढण्यात आली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील (इरविन चौक) डा.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून या अभिवादन यात्रेनं नया अकोला कडे प्रयाण केलं रॅलीमध्ये काँग्रेस नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे, कर्नाटक येथील आमदार प्रदीप ईश्वरसह काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी.. झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते बाबासाहेबांचे अस्थिकलश असलेल्या नया अकोला पर्यंत रॅलीचे आयोजन..करण्यात आलं
स्वतः दुचाकी चालवत यशोमती ठाकूर रॅलीत सहभागी झाल्या नया अकोला येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला काँग्रेस कडून अभिवादन करण्यात आलं महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी अस्थिकलश यात्रा काढली जाते नया अकोला येथे माजी आ. यशोमती ठाकूर यांनी सभा घेतली. संविधानासाठी जीव गेला तरी चालेल परन्तू संविधानाला हात लावू द्यायचा नाही असं त्या म्हणाल्या