उमेश रमेश नाईक यांनी हजर होण्याचे आवाहन

अमरावती:- दि. 9 (जिमाका): जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, अमरावती यांचे अधिनस्त अधिक्षक शासकीय मुलांचे अनुरक्षणगृह, वरिष्ठ बालगृह, अमरावती संस्थेत स्वयंपाकी पदावर उमेश रमेश नाईक हे काम करीत होते. उमेश रमेश नाईक यांनी स्वयंपाकी पदावर कार्यरत असताना कर्तव्यात कसूर केल्याबाबत त्यांच्यावर दोषारोप लावण्यात आले आहे. त्यानुसार त्यांना हजर होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उमेश रमेश नाईक स्वयंपाकी यांनी म्हणणे मांडणे कामी त्यांचेकडे असलेल्या आवश्यक पुरावे, कागदपत्रासह त्यांना दि. 29 ऑक्टोबर, दि. 6 नोव्हेंबर, दि. 14 नोव्हेंबर, व दि. 28 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, महिला व बाल विकास भवन, राणी दुर्गवती चौक, कॅम्प रोड, अमरावती येथे हजर राहण्यासाठी कळविण्यात आले आहे. परंतू उपरोक्त दिनांकास ते गैरहजर राहिले आहेत. त्यामुळे त्यांचे म्हणणे या कार्यालयासमोर आलेले नाही.
त्यांचे म्हणणे मांडणे कामी असलेल्या आवश्यक पुरावे, कागदपत्रासह आठ दिवसाचे आत न चुकता हजर राहावे. ही अंतिम संधी देण्यात येत आहे. सदर कालावधीत म्हणणे आवश्यक कागदपत्र व पुराव्यासह हजर न झाल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहित धरून श्री नाईक यांच्या प्रकरणावर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. याची गांर्भीयाने नोंद घेण्यात यावी, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.