चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रात बिबट्याच्याचा पिल्लाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

वडाळी सह चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात सर्वात जास्त बिबट्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू होत आहे .. आता पुन्हा शुक्रवारी चिरोडी जंगलातील रस्त्यावर वाहनाच्या धडकेने एका बिबट्याच्या पिल्लूचा मृत्यू झाला आपल्या मृत पिल्लाजवळ बिबट मादी केविलवाणी बसलेली होती ,,तेथे सकाळी ग्रामस्थानी गर्दी केल्याने अखेरीस पिल्ल्याच्या आईनेरानाची वाट धरली ,, सकाळी वनविभागाचे अधिकारी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला , वडाळीच्या बांबू गार्डन येथे मृत बिबट्याचा अंतिम संस्कार करण्यात आला.
वन्यजीव परिक्षेत्रातील बिबट्यांचा सर्वात जास्त वावर वडाळी आणि चांदूररेल्वे वनपरिक्षेत्रात आढळून येतोय , हल्ली जंगलतोड करून मानवी वस्ती होते आहे जंगलांवर माणसाने अतिक्रमण केल्याने वन्यप्राण्यांना धोका निर्माण झाला आहे, जंगलभागातून वन्यप्राण्यांचा संचार असल्याने रस्ता ओलांडताना अपघात सुद्धा होत आहे, अशाच एका वाहनाच्या धडकेने शुक्रवारच्या रात्री एकाबिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाला .
अमरावती शहरालगत असणाऱ्या चिरोडी जंगलातील चिरोडी ते कारला मार्गावर एक वर्ष वयाचा बिबट्या अपघातग्रस्त होऊन ठार झाल्याची घटना घडली आहे. माहिती मिळताच शनिवारी पहाटे वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.रात्रभर बिबट्याचं पिल्लू मृतावस्थेत रस्त्यावर पडून राहिल त्यात त्याच्या आईने मादी बिबटने त्याला रस्त्याच्या बाजूने उचलून ठेवलं ,अशी ग्रामस्तांत चर्चा दिसून आली ,मृत पिल्लाची केविलवाणी आई पहाटे पर्यत पिल्लाजवळच होती, मात्र सकाळी नागरिकांनी गर्दी करताच ती जंगलात निघून गेली .घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक सकाळी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर मृत बिबट्याला अंत्यसंस्कारासाठी वडाळी येथील बांबू उद्यान परिसरात आणण्यात आलं.त्याच ठिकाणी मृत बिबट पिल्लावर अग्नी संस्कार करण्यात आला.