Uncategorized
हाती मशाल व मेणबत्ती घेऊन विदयार्थ्यांनी डॉ आंबडेकरांना वाहिली आदरांजली

६ डिसेम्बर ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी देशातील सर्वानी बाबासाहेबाना आदरन्जली वाहिली ,, अमरावती शहरात अनेक विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढून आगळी वेगळी आदरांजली वाहिली .. एका विदयार्थींनिच्या हातात मशाल तर इतरांच्या हाती मेणबत्ती घेऊन विविध मार्गाने शांततेत रॅली काढण्यात आली ,, शेगाव , सिद्धार्थ नगर भीम नगर आदी परिसरातून सामूहिक भीमज्योत रॅली काढण्यात आली या रॅली डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यानजीक एकवटल्या ,,इर्विन परिसरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला सलामी देऊन आदरांजली वाहण्यात आली ,, रॅलीचे दृश्य पाहायला रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी जमली होती