अचलपूरचा जलतरण तलाव कित्येक वर्षांपासून पडलाय बंद

अमरावती जिल्ह्याच्या सर्व नगरपालिका क्षेत्रामध्ये जलतरण तलाव स्थापित करण्यात आले होते. 2013 माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते रंकाळाचा लोकार्पण करण्यात आलं होतं. अचलपूर चे माजी नगराध्यक्ष अरुण वानखडे यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेला हा तलाव कित्येक वर्षापासून बंद पडलेला आहे. विशेष म्हणजे या तलावाला सुरू करण्यासाठी आज पर्यंत कोणत्याही राजकीय संघटनेने किंवा सामाजिक संघटनेने आवाज उचलला.नाही हि जागा आता असामाजिक तत्त्वांचा अड्डा बनलेला आहे. विविध आमली पदार्थांचे सेवन करण्याच ठिकाण हा तलाव झाला आहे झालेला आहे. आज पर्यंत याच्यावर आमदार खासदारांनी लक्ष दिलं नाही हा स्विमिंग टॅंक लवकरात लवकर सुरू होण्याची मागणी अचलपूर परतवाडा ची जनता करत आहे.
पोहण्याचा सराव करण्यासाठी किन्वा व्यायाम करण्यासाठी नागरिकांची सोय व्हावी म्हणून अचलपूर येथे स्वामिंग पूल तयार करण्यात आला मात्र दुर्लक्षित राह्यल्याने हा तलाव असामाजिक तत्वांचा अड्डा बनलाय 2013 माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या स्विमिंग पुलंचं लोकार्पण करण्यात आलं होतं आज हा तलाव कोरडा ठणठणीत पडला असून आजूबाजूला तण वाढलं आहे अशी दुर्दशा झाली आहे याकडे कोणाचंही लक्ष नाही तेव्हा या स्विमिंग पूल चं पुनरुत्थान करण्यात यावं अशी मागणी नागरिकांची आहे