अमरावतीच्या आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांचे मुंबईहून अमरावतीला आगमन..

अमरावती दिनांक-१० डिसेंबर :- महाराष्ट्र् विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर राज्यात महायुती सरकारची सत्ता स्थापन झाली. त्यानंतर वर्ष २०२४ ते २०२९ पर्यतच्या १५ व्या विधानसभेवर निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीसाठी तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलाविण्यात आले होते. या काळात अमरावती विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके या मुंबईतच असल्याने त्या अमरावती येथे कुणालाही भेटू शकल्या नाही. दरम्यान ०७ डिसेंबर रोजी आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी महाराष्ट्र विधानसभा सदस्यपद व गोपनीयतेची शपथ घेवून आपल्या आमदारकीच्या कार्यभाराला सुरुवात केली आहे. अधिवेशन आटोपताच अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांचे आज १० डिसेंबर रोजी सकाळी अमरावतीत आगमन झाले असून त्या आपल्या मतदार संघातील दैनंदिन कामकाजात सक्रीय झाल्या आहे. दरम्यान बुधवार ११ डिसेंबर ते १५ डिसेंबर २०२४ पर्यंत सकाळी ०९.३० वाजता ते ११ वाजेपर्यंत आ.सौ.सुलभाताई खोडके या मतदारसंघातील सर्व अभ्यागतांना नियमित भेटीसाठी निवासस्थान खोडके प्लॉट,गाडगे नगर अमरावती येथे उपलब्ध राहणार आहे. तसेच मतदार संघातील नागरिकांच्या काही तक्रारी व समस्या असल्यास त्यासुद्धा जाणून घेणार असून पाठपुरावा करण्यात येईल. सदर बाबींची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती प्रसिद्ध करण्यात आली.