LIVE STREAM

AmravatiCity CrimeLatest News

लालखडी मार्गावर गांजा विक्री करणारा शहर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

शहरात गांजा तस्करीला आळा घालण्यासाठी शहर पोलीस यंत्रणा आता सज्ज झाल्याचे दिसून येत आहे, पंचवटी चौकात धडक कारवाई नंतर आता पुन्हा शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने सापळा रचून एकाला ताब्यात घेतले, लालखडी ते नवसारी रिंगरोड वरिल मन्नत हॉलजवळ हि धडक कारवाई करण्यात आली, यात २० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करून गुन्हे दाखल करण्यात आले.

शहरात गांजा विक्री करणाऱ्याच्या विरोधात आता शहर गुन्हे शाखा पोलीस पथक धडक कारवाई करण्यास सज्ज झाले आहे, काहीच दिवसाआधी गाडगे नगर पंचवटी चौकात लाखो किमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता आता पुन्हा शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लालखडी ते नवसारी रिंगरोड वरिल मन्नत हॉलजवळ सापळा रचून एकाला ताब्यात घेतले, पोलीस पथक नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहिती मिळाली, यावर लालखडी ते नवसारी रिंगरोड वरील मन्नत हॉल जवळ रेड करून शरिफ बेग रशीद बेर्ग रा.लालखडी शरीफ बेग रशीद बेग वय २८ वर्ष रा. लालखडी वॉटर सप्लाय या दोघांना ताब्यात घेतले, त्यांच्या जवळील २० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला , दोघांविरुद्ध नागपुरी गेट पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले हि कारवाई शहर पोलीस आयुक्त, नवीनचन्द्र रेडडी पोलीस उपआयुक्त कल्पना बारवकर पोलीस उपआयुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे,पोलीस कर्मचारी इशय खांडे, छोटेलाल यादव, मंगेश लोखंडे, निवृत्ती काकड, अमोल मनोहर, आशीष डवले , योगेश पवार, चालक गजानन सातंगे, किशोर खेंगरे, यांनी केली

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!