बडनेरा रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजता लूटमारी

बडनेरा शहरात लग्नाच्या समारंभाला पाहुणे म्हणून आलेल्या इसमाच्या चारचाकी वाहन पंचर करून सोन्याचे ब्रासलेट सह चेन लुटल्याची घटना बुधवारी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान बडनेरा रेल्वे स्टेशन परिसरात घडल्याचे जळगाव येथील व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले यात त्यांना मारहाण करून पसार झाल्याची प्रतिक्रिया स्पष्ट केली,सिकची रिसॉर्ट येथे लग्न कार्यासाठी आलेल्या जळगाव येथील पाहुण्यां सोबत असा प्रकार घडल्याने शहर पोलीस उपायुक्त आयुक्त सागर पाटील यांनी दुपारच्या दरम्यान लगेच बडनेरा शहर गाठले, घडलेल्या घटनेची माहिती जाणून घेतली असता, बडनेरा रेल्वे स्टेशन कडे पाहुण्यांना घ्यायला जात असताना जयहिंद चौकात घुमंतू लोकांना वाहनाचा धक्का लागला, यात त्या घुमंतू लोकांनी वाहनाचा पाठलाग केला त्यात त्याची वाद होऊन झटापट झाली अशात मात्र या घटनेला व्यापाऱ्याने लुटमारीचे वळण दिल्याचे पोलीस उपायुक्त पाटील यांनी खुलासा केला आहे, सध्या या प्रकरणात कोणती हि तक्रार बडनेरा पोलिसात दाखल करण्यात आली नाही