LIVE STREAM

AmravatiLatest NewsMaharashtra Politics

अमरावती विधानसभा मतदार संघातून दुसऱ्यांदा नवनिर्वाचित झालेल्या आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव..

अमरावती दिनांक – १२ डिसेंबर : निवडणुकीपूरता पक्ष असतो, नंतर ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिलं, काम करण्यासाठी संधी दिली असल्याने सर्व समाजघटक व जनतेसाठी कामे करणे एक लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असते. त्यामुळे कुणाविषयी सुद्धा राग, द्वेष व ममत्व न बाळगता मी माझे काम मोठ्या श्रद्धेने व निष्ठेने पार पाडणार आहे. जनतेने जो विश्वास दर्शविला, त्या विश्वासाला कुठलाही तडा जाऊ न देता आपण जे कर्तव्य हाती घेतले आहे. ते उन्नत राखण्यात आपण कटीबद्ध असल्याचा विश्वास अमरावती विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार सौ.सुलभाताई संजय खोडके यांनी व्यक्त केला.

तसेच निवडणूकपूर्व काळात सर्व सहकारी, स्नेहीजन व हितचिंतकांनी अथक मेहनत व परिश्रम घेतले. तसेच मतदारांनी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे मतदानकरून आशीर्वाद प्रदान केले, त्याबद्दल ऋणी राहणार असल्याची कृतज्ञता आमदार महोदयांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र विधानसभा २०२४ च्या सत्तास्थापना व विषेश अधिवेशनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ आटोपताच अमरावती विधानसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित आमदार सौ.सुलभाताई खोडके या मुंबईहून अमरावतीला परत आल्या असून मतदार संघातील दैनंदिन कामकाजात सक्रिय झाल्या आहेत. दरम्यान त्यांचे स्वागत, शुभेच्छा व अभिनंदन करण्याला घेऊन गाडगे नगर स्थित निवासस्थानी स्नेहीजन, हितचिंतक व सहकाऱ्यांची गर्दी होत आहे. यावेळी आ.सौ. सुलभाताई खोडके यांनी सर्वाना भेटून,शुभेच्छाचा स्वीकार करीत संवाद साधला आहे.

दरम्यान विविध शिष्टमंडळाच्या वतीने अमरावतीच्या नवनिर्वाचित आमदार सौ. सुलभाताई खोडके यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार देखील करण्यात आला. कुणी शब्दसुमनांनी, कुणी लिखित संदेश देऊन तर कुणी भेटवस्तू देऊन आपल्या लाडक्या व लोकप्रिय आमदार सुलभाताईंवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

मागील पाच वर्षात आमदार म्हणून कार्यरत असतांना सौ.सुलभाताई खोडके यांनी अमरावतीच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव अशी विकासात्मक कामगिरी केल्याने शहराचा चेहरा-मोहरा बदलला आहे. त्यांच्या कार्यकाळात शहराला नवे वैभव व लौकिक प्राप्त झाल्याने अमरावतीचा विकास केवळ सुलभाताईच करू शकतात. त्यामुळे आम्ही सदैव सुलभाताई यांच्या सोबत राहणार असल्याचा विश्वास सर्व स्नेहीजन, हितचिंतक व अभ्यागतांनी यावेळी व्यक्त केला.
अमरावती शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. वाढते शहरीकरण लक्षात घेता स्थानिक भागात पायाभूत सुविधांची पूर्तता करण्यासह आरोग्य, शिक्षण, क्रीडा विकास साधणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, सर्वसमावेशक घटकांचे सामाजिक प्रश्न सोडविणे,जनतेला शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी आपण कटीबद्ध असून सर्व सामाजिक संस्था, मंडळे,प्रशासन व सर्व यंत्रणांशी समन्वय साधून आपण शहराच्या विकासाला नवी दिशा व गती देण्यासह नवा आयाम देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या वतीने देण्यात आली.

यावेळी संजीवनी कॉलोनी मित्र परिवार,राऊळ माय-राऊळ बापू पारायण मंडळ,सरयुपारीण ब्राम्हण महासभा, निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशन,जिजाऊ ब्रिगेड,अमरावती, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, श्री जगदगुरु नरेन्द्रचार्यजी महाराज संप्रदाय, ऑरेंज सिटी पत्रकार संघ,वरुड,श्री गजानन महाराज मंदिर दिप प्रतिष्ठान कॉलोनी,महात्मा फुले बहूउद्देशीय संस्था,महिला आघाडी, मल्हार सेना-अमरावती, भारतीय बावणे कुणबी कृषक समाज,अमरावती, मध्यवर्ती कोषागार संघटना, जिल्हा शाखा-अमरावती, सिटीलँड वेल्फेअर असोसिएशन-बोरगाव धर्माळे, बिझिलँड व्यापारी बांधव संघटना, ,ड्रीमलँड व्यापारी बांधव संघटना,महाराष्ट्र स्टेट मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह.

असोसिएशन(एम.आर.युनियन)आदींसह सामाजिक, राजकीय, शिक्षण व शैक्षणिक संस्था, उद्योग, क्रीडा, व्यापार, सहकार,प्रशासन, आरोग्यसेवा, कृषीसेवा, शासकीय व निमशासकीय सेवेतील नोकरदार वर्ग, अशासकीय संस्था,महिला विकास, पत्रकारिता, यासह धार्मिक, आध्यामिक विश्वस्त संस्था आदी क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच स्नेहीजन, सहकारी व हितचिंतक यांची मोठी उपस्थिती होती.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!