LIVE STREAM

Latest NewsMaharashtra Politics

सभापती जगदीश धनखड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव

राज्यसभेत सभापती जगदीश धनखड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी आणला आहे. त्यावरुन शुक्रवारी जोरदार गदारोळ झाला. सभापती जगदीश धनखड आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात बाचाबाची झाली. जगदीश धनखड म्हणाले, एक शेतकऱ्यांचा मुलगा या पदावर बसल्याचे तुम्हाला सहन होती नाही. त्यावर मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, तुम्ही जर शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मीही मजुराचा मुलगा आहे. राज्यसभेत गदारोळ सुरुच राहिल्यामुळे कामकाज सोमवार पर्यन्त स्थगित करावे लागले.

राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांच्या विरोधात सभागृहात अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे. आपल्या विरोधात आणला जाणारा अविश्वास प्रस्ताव आणि पक्षपाती असल्याचे धनखड यांनी सांगितले. ते म्हणाले, मी तुम्हाला विचार करायला सांगत आहे. तुमची देहबोली पहा आणि तुम्ही काय म्हणत आहात याकडे लक्ष द्या. मी आतापर्यंत खूप सहन केले. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी दुर्बल होणार नाही. मी या देशासाठी मरेन. शेतकऱ्याचा मुलगा या पदावर का बसला आहे. त्याचा तुम्ही विचार करत नाही. आजचा शेतकरी हा केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. धनखड म्हणाले, तुम्ही आधी नियम वाचा. अविश्वास प्रस्ताव आणला तर तो 14 दिवसांत येईल. मी तुम्हाला वेळ काढून मला भेटण्याची विनंती करतो. तुम्ही येत नसाल तर मी येईल. राज्यसभेचे कामकाजही सुरू झाल्यानंतर प्रचंड गदारोळ विरोधकांनी केला. त्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधकांवर नाराज झाले. यावर काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, तुम्ही जर शेतकऱ्याचा मुलगा असाल तर मीही मजुराचा मुलगा आहे.

जगदीश धनखड म्हणाले, तुम्ही माझ्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. तो तुमचा अधिकार आहे. यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी सोमवारी 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यसभेचे कामकाज स्थगित केले. तसेच काँग्रेस अध्यक्ष खरगे यांना दुपारी 12.15 वाजता त्यांच्या केबिनमध्ये भेटण्यासाठी बोलावले. परंतु तुम्ही राज्यघटनेची पायमल्ली करत आहात. दरम्यान भाजपने राज्यसभेतील आपल्या खासदारांनी व्हिप जारी केला आहे. 16 आणि 17 डिसेंबर 2024 रोजी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी तीन लाईनचा व्हिप जारी केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!