केंद्राकडून दादांना ऑफर? – संजय राऊत

महायुतीमधील राष्ट्रवादी पक्षाला केंद्रात एकही मंत्रिपद मिळाले नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला पूर्णपणे अपयश आल्याचं पाहायला मिळालं. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची फक्त एक जागा निवडून आली होती. त्यामुळे केंद्रात सरकार स्थापन झाल्यावर अजित पवारांच्या पक्षाला एकही मंत्रिपद मिळालं नाही. मात्र दादा मंत्रिपदासाठी इच्छुक होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे.
राऊत म्हणाले, अजित पवार यांना केंद्रात यासाठी मंत्रिपद नाही. कारण केंद्रात फॉर्मुला ठरला होता की. सहा खासदारांमागे एक मंत्रिपद, अशी माझी माहिती आहे. प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितलं आहे की, शरद पवारांचे पाच खासदार घेऊन या मग तुम्हाला मंत्रिपद देऊ. आशा प्रकारे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये खळबळजनक दावा केला आहे. केंद्राने अजित पवारांना ऑफर दिली असल्याचही रे म्हणाले.