घरफोड्या करणारा अट्टल चोरटा नागपुरी गेट पोलिसांच्या ताब्यात

अमरावती :- नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी चा गुन्हा पोलिसांनी उघड केला आहे २८ वर्षीय आरोपीला अटक केली असता तीन घरफोड्या केल्याचं त्याने कबूल केलाय. या आरोपीकडून पोलिसांनी तिन्ही घरफोड्यातील २ लाख, ५३ हजार, ४४० रुपयांचे नेकलेस, मंगळसूत्र, पैंजण,अंगठी असे सोनं चांदीचे दागिने जप्त केले आहेत.
नागपुरी गेट पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या घरफोड्यांचा छडा पोलिसांनी लावलाय . घरफोडीच्या गुन्ह्यातील अन्सार नगर येथे रहाणारा आरोपी २८ वर्षीय जब्बार खान रऊफ खान याला अटक करून घर फोडीचे तीन गुन्हे उघड केले आहेत त्याला तब्यत घेऊन चौकशी केली असता त्याने नागपुरी गेट परिसरात घरफोडी केल्याचं कबूल केलंय गुन्हयात चोरी गेलेलं सोन्याचं नेकलेस, अंगठी, पोत, चांदीचे पैंजण, मंगळसूत्र असा २ लाख,५३ हजार, ४०० रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक हनमंत उरूलागोंडावार पोलीस निरीक्षक जनार्धन साळुंखे, गजानन विधाते,फुलचंद पटेल, शिवनाथ आंधळे,आनंद ठाकूर, दिनेश नांदे,डॅनिश, राहुल, मोहन यांनी हि कारवाई केली.