अशी असेल एकनाथ शिंदेंच्या 11 मंत्र्यांची टीम; 6 जणांना पहिल्यांदाच संधी, तिघांना डच्चू ?

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार :- महायुती सरकारच्या मंत्रिमडळाचा विस्तार आज होण्याची दाट शक्यता आहे. नागपुरातील राजभवनात हा शपथविधी पार पडणार आहे. 30 ते 32 मंत्री शपथ घेतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनुसार, शिवसेनेला 10 ते 12 खाती देण्याच आल्याचे बोलले जात आहे. अशातच शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह आणखी 43 सदस्य असू शकतात. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अलीकडेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेतली होती. सूत्रांनुसार, भाजपला 20-21 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला 10-12 आणि राष्ट्रवादीला 9-10 मंत्रीपदे मिळू शकतात. तसंच, गृहनिर्माण आणि पर्यटन अशी दोन खाती शिवसेनेकडे असणार अशी माहिती समोर येतेय. गेल्या काही दिवसांपासून गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार याची चर्चा होती. शिवसेना गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याचे सांगण्यात येत होते. सूत्रांनुसार, भाजपने गृह मंत्रालय कोणाला सोपवणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कशी असेल एकनाथ शिंदे यांची टीम
पाच जणांवर पुन्हा विश्वास
1) उदय सामंत, कोकण
2) शंभुराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
3) गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
4) दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
5) संजय राठोड, विदर्भ
टीम शिंदेचं नवे शिलेदार
1) संजय शिरसाट, मराठवाडा
2) भरत गोगावले, कोकण
3) प्रकाश अबिटकर, पश्चिम महाराष्ट्र
4) योगेश कदम, कोकण
5) आशिष जैस्वाल, विदर्भ
6) प्रताप सरनाईक, ठाणे
कुणा कुणाचा पत्ता कट –
1) दीपक केसरकर
2) तानाजी सावंत
3) अब्दुल सत्तार
शिवसेनेला कोणते खाते ?
गृह किवा नगरविकास अशी दोन्ही खाती शिंदेसेनेला दिली जाणार नाहीत अशी चर्चा आहे. शिवसेनेला पर्यटन आणि गृहनिर्माण अशी दोन खाते देण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांना फोन
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून देणार उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचे समजतेय. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतरच मंत्रीपदांवर शिक्कामोर्तब होणार आहे.