भयंकर ! शर्टाने घात केला ; चायनीजच्या मशीनमध्ये अडकून मजुराचा मृत्यू

मुंबई :– मुंबईच्या दादरमधून खळबळजनक घटना समोर आली आहे. मुंबईच्या दादरमध्ये शनिवारी रात्री चायनीज बनवण्याच्या मशीनमध्ये अडकून एका मजुराचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या तरुण मजुराचा मशीनमध्ये अडकून जागीच मृत्यू झाला. मजूर मशीनमध्ये अडकल्यानंतर कारखान्यात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दादरमध्ये एका मशीनमध्ये अडकून २२ वर्षीय मजूराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दादरमधील प्रभादेवीच्या नरीमन भाटनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. चायनीज बनवण्याच्या मशीनमध्ये अडकून या २२ वर्षीय मजूराचा मृत्यू झाला आहे. सूरज यादव असे मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
नेमकं काय घडलं ?
दादरमधील प्रभादेवीच्या नरीमन भाटनगर भागात चायनीज बनवणारा कारखाना आहे. या कारखान्यात चायनीज बनवण्यासाठी मशीन आहेत. या चायनीज बनवण्याच्या मशीनमध्ये अडकून २२ वर्षीय सूरज यादव नावाच्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सूरजचा शर्ट मशीनमध्ये अडकल्याने आत खेचला गेल्याची माहिती आहे.