हवामान अपडेट : ऐन हिवाळ्यात पाऊस बरसणार , तर सर्वाधिक थंडी चा कडाका ? IMD चा रिपोर्ट वाचा

नवी दिल्ली :- उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. तर जम्मू काश्मीर, लडाख आणि आसपासच्या भागात १६ ते १७ डिसेंबर रोजी पावसाहित बर्पवृष्टी होण्याची शक्यता आहे. ऐन हिवाळ्यात पावसाच्या शक्यतेने वातावरणात मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. वातावरणातील बदलामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
उत्तर प्रदेश, बिहारसहित अनेक राज्यात शीतलहरींचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे. यामुळे दक्षिणेतील अनेक राज्यात पावसाची शक्यता आहे. मागील २४ तासांत तामिळनाडू भागात मुसळधार पाऊस झाला. तसेच पंजाब, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर , लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा चंदीगड, उत्तर प्रदेश इत्यादी राज्यांना शीतलहरीचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूत १७ आणि १८ डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या व्यतिरिक्त १४ , १६-१९ डिसेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे. केरळात १४,१८,१९ डिसेंबर रोजी पावसाची शक्यता आहे. कर्नाटकात १७ आणि १८ डिसेंबर रोजी पावसाची अलर्ट देण्यात आला आहे. तर अंदमान आणि निकोबार द्वीपमध्ये १४ आणि १५ डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर भारतात कडाक्याची थंडी
उत्तर पश्चिम भारतात किमान तापमान ५-१० डिग्री सेल्लिअसवर पोहोचलं आहे. तर मध्य भारतात वातावरण १०-१६ डिग्री सेल्सिअसदरम्यान आहे. ओडिशा,गंगीय पश्चिम बंगाल, पश्चिम भारतातही १०-१६ डिग्री सेल्सिअसदरम्यान तापमान आहे. मागील २४ तासांत किमान तापमान एक ते दोन डिग्री सेल्सिअसने कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
पंजाबच्या आदमपूरच्या मैदानी भागात किमान तापमान ०.७ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उत्तर पश्चिम भारतात मागील २४ तासांत वातावरणात कोणताही बदल दिसून आला नाही. मध्य भारतात पुढील तीन दिवसांत किमान तापमान कोणताही बदल पाहायला मिळण्याची शक्यता नाही. मात्र, त्यानंतर दोन दिवसांत दोन ते तीन डिग्री सेल्सिअसने तापमान वाढण्याची शक्यता आहे.