हमालपुरा येथील अमरावती जिल्हा परिषद शिक्षक बँक अध्यक्ष सह तत्कालीन सदस्य विरोधात राजापेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल…

अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक अध्यक्ष गोकुल राऊत सह तत्कालीन सदस्य यासोबत सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक को ऑपरेटिव्ह चे अध्यक्ष मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात कलम 420,120,ब अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. फिर्यादी अचलपूर येथील काकडा रहिवासी श्रीधर बोन्डे यांनी तक्रार दाखल केली..राजापेठ पोलिसांनी प्रकरण आर्थिक गुन्हे शाखे कडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखा तपास करीत आहे.
22एप्रिल 2024मध्ये जिल्हा परिषद सहकारी बँक वतीने पदभरती जाहिरात दिली होती.. हिच परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती.. मात्र ही परीक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष तत्कालीन संचालकानी सर्व माहिती विद्यार्थ्यांपासून दूर ठेवली होती असा आरोप करण्यात आला आहे.. पदभरती आधीच फ़िक्सिग झाल्याची विद्यार्थ्यांना आधीच माहिती झाली होती.. ज्या वेळी पदभर्ती निकाल जाहीर करण्यात आला तेव्हा परीक्षार्थ्यांची शंका स्पष्ट झाली.. यावर फिर्यादी श्रीधर बोन्डे यांनी बँक अध्यक्ष सह तत्कालीन संचालकांच्या विरोधात तक्रार दाखल केली.. हिच पदभर्ती 7फेब्रुवारी ते 29एप्रिल पर्यंत सोलापूर नागरी सहकारी बँक वतीने घेण्यात आली होती त्यामुळे या बँकेचे अध्यक्ष सह मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या विरोधात सुद्धा गुन्हे दाखल करण्यात आले.. आता या प्रकरणाचा आर्थिक गुन्हे शाखा तपास करण्यात लागले आहे.