थंडीचा कडाका वाढल्याने जागोजागी पेटताहेत शेकोट्या

राज्यात थंडीचा कडाका वाढलाय हा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय ११ डिग्री सेल्सिअस पर्यंत पारा उतरलाय नागरिक गारठले आहेत. अमरावतीमध्ये थन्डी वाढली आहे. त्यामुळे स्वेटरच्या दुकानातील गर्दी वाढली आहे तर ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. स्वेटर टोपी घालूनही थंडी जुमानत नसल्याने जागोजागी शेकोट्या पेटवून गारठलेले हात शेकताना नागरिक दिसताहेत .
थंडीचा कडाका वाढला आहे. येत्या तीन दिवस पुन्हा जिल्ह्यातील किमान तापमान ११ ते १३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजता श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान केंद्राने ११ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद केलीय
त्याचवेळी भारतीय हवामान खात्याने १३ अंश किमान तापमान नोंदवले आहे.
सध्या हिमालय क्षेत्रात सुरू असलेली बर्फवृष्टी व उत्तरेकडून येणारे गार वारे यामुळे जिल्हा थंडीने गारठला आहे. यापासून किमान तीन दिवस तरी दिलासा मिळणार नाही .शुक्रवारी लक्षद्वीपजवळ हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, ते लवकरच निवळण्याची शक्यता आहे. तसेच शनिवार, १४ डिसेंबरला बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वारे वाहण्याची व त्यापासून हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची स्थिती दिसून येत आहे.
परंतु, १७ डिसेंबरपासून किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या किमान तापमान हे ११ ते १३ अंश सेल्सियसदरम्यान आहे शहरासह ग्रामीण भागात आता कडाक्याची थंडी निर्माण झाली आहे. अमरावती जिल्हा गारठला आहे.
भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात ग्रामस्थ शेकोटी करून बसले.त . थंडी ने शेतात दव पडले तर शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे अशी भीती शेतकऱ्यानी आमच्या सिटी न्यूज कडे व्यक्त केलीय