LIVE STREAM

Uncategorized

एक शिल्लक राहिलेलं मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव; अजित पवार गटाच्या नेत्याचं मोठं विधान

मुंबई :- अखेर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला फडणवीस सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. यावेळी 33 जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली तर सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आधीच झाला आहे. भाजपच्या 19, शिंदे गटाच्या 11 आणि अजित पवार गटाच्या 9 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अद्यापही एक मंत्रिपद रिक्त ठेवण्यात आलं आहे.

नाराज छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार ? दोन ओळीत स्पष्ट संकेत; म्हणाले…

या रिक्त ठेवलेल्या मंत्रिपदावरुन सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. अजित पवारांनी हे मंत्रिपद का राखीव ठेवलं असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी माध्यमांसमोर केलेल्या विधानावरुन ही चर्चा अधिक भडकली आहे. मंत्रिमंडळातील शिल्लक ठेवलेली जागा जयंत पाटलांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचं ते यावेळी म्हणाले. लवकर जयंत पाटील आमच्यासोबत येतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील हे अजित पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. विधिमंडळात बोलत असताना याच मुद्द्यावरुन जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती. आम्ही बोलवतो पण तुम्ही येत नसल्याचं अजित पवार थेट जयंत पाटलांना म्हणाले होते. यावर जयंत पाटलांनीही सूचक प्रतिक्रिया दिली होती. पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय घेतो असंही ते यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेवरुन ती योग्य वेळ कधी येणार असे सवाल उपस्थित केले जात होते. ती योग्य वेळ आल्याचं म्हणत अमोल मिटकरींनी जयंत पाटलांसाठी मंत्रिपद राखीव ठेवल्याचं म्हटलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!