LIVE STREAM

Accident NewsIndia NewsLatest NewsMaharashtra

CNG भरताय, सावधान ! तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर ही बातमी चुकवू नका

तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मोबाईलच्या वापरामुळे, पेट्रोल पंपावरील CNG गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याला डोळा गमवावा लागला आहे. नेमकं काय घडलं आहे जाणून घ्या.

वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे अनेकजण सीएनजी कारचा वापर करायला लागले आहेत. जर तुमच्याकडे सीएनजी वाहन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात पेट्रोल पंपावरील गॅसचे नोझल उडून एका कर्मचाऱ्याला डोळा गमवावा लागला आहे. पुण्यातील एका पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. यात मोबाईलच्या वापरामुळे नाही तर निष्काळजीपणामुळे एका कर्मचाऱ्याला आपला डोळा गमवावा लागला आहे.

पुण्यातील सीएनजी पंपावरच्या सीसीटीव्हीत हर्षद गेहलोत सीएनजी पंपावर दिसत आहेत. त्यांनी एका दुचाकीस्वाराच्या दुचाकीमध्ये सीएनजी भरला. त्यानंतर गॅसचं नोझल जागेवर ठेवलं. पण काही सेकंदात ते नोझल त्यांच्या अंगावर उडालं आणि त्याचा जोरात फटका बसला. नोझल जोरात वेगाने उडून त्याच्या चेहऱ्यावर बसलं. अतिशय प्रेशरने ते हर्षदच्या चेहऱ्यासह, डाव्या डोळ्यावरही लागलं. नोझल इतक्या प्रेशरमध्ये लागलं की हर्षद खाली कोसळला. सीएनजी गॅसच्या प्रेशर मुळे हर्षद गणेश गेहलोत या कर्मचाऱ्यांच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे.

दुर्घटनेनंतर पंप मालकाकडून जखमी कर्मचा-याला उपचारासाठी आर्थिक मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र, मदत दिली जात नसल्यानं गेहलोत कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

कर्मचा-याच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचं पंप मालकांना म्हणत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. कर्मचा-याचं लक्ष नसल्यानं नोझल लॉक झालं नाही त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं पंप मालकानं म्हटलं आहे.

पुण्यातील या सीएनजी पंपावरील दुर्घटनेनंतर पंपावरील कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. आणि सीएनजी भरताना काय काळजी घ्यावी लागते ते ही पुन्हा समजण्याची गरज आहे.

या घटनेनंतर सीएनजी पंपावरील कर्मचारी आणि ग्राहकांच्या सुरक्षेतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पंप व्यवस्थापन आपल्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी पुरेसे सुरक्षा उपाय लागू करण्यात अपयशी ठरले. कामाच्या ठिकाणी खबरदारीची यंत्रणा किंवा सुरक्षा प्रोटोकॉलचा अभाव हे अपघाताचे कारण ठरलं आहे. पंपावर काहीं साधे नियम चालक आणि कर्मचा-यांसाठी आहेत ते पाळा आणि सुरक्षित राहा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!