हिंदू रक्षा समिती गोवा तर्फे आयोजित हिंदु जागृती फेरी व होणाऱ्या भव्य जाहीर

हिंदु रक्षा समितीद्वारे गोवर्धन भवन खडपाबांध फोंडा येथे 19 डिसेंबर ला दुपारी 4 वाजता हिंदु युवक-युवतीची जागृती फेरी तसेच सायंकाळी 5 वाजता जाहीर सभेचे आयोजन केल आहे. भारतभर हिंदु शेरणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी संपूर्ण भारतात हिंदुत्व जागृत करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. त्यामुळे मा.खा. नवनीत रवि राणा यांना हिंदुत्वाचा हुंकार भरण्याकरिता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत तसेच हिंदु रक्षा समितीद्वारे आयोजित जागृती फेरी व जाहीर सेभेमध्ये प्रमुख वक्ता म्हणून विशेष आमंत्रित केले आहे
बांग्लादेशामध्ये गेल्या अनेक दिवसापासून हिंदू समाजावर अन्याय पूर्वक व अतिशय क्रुर पद्धतीने अत्याचार होत आहे. या घटनेची प्रतिक्रिया संपूर्ण भारतामध्ये उमटत आहे.गोव्याची राजधानी पणजी पासून अवघ्या 30 कि.मी. अंतरावर असलेल्या फोंडा गावामध्ये आरएसएस, विएचपी, बजरंग दल अशा सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे सदस्य, हितचिंतकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी हिंदु रक्षा समितीची स्थापणा केली आहे. या हिंदु रक्षा समितीद्वारे गोवर्धन भवन खडपाबांध फोंडा येथे 19 डिसेंबर ला दुपारी 4 वाजता हिंदु युवक-युवतीची जागृती फेरी तसेच सायंकाळी 5 वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन केले आहे.
हिंदु शेरणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी संपूर्ण भारतात हिंदुत्व जागृत करण्यासाठी विशेष योगदान दिले आहे. त्यामुळे मा.खा. नवनीत रवि राणा यांना हिंदुत्वाचा हुंकार भरण्याकरिता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदजी सावंत तसेच हिंदु रक्षा समितीद्वारे आयोजित जागृती फेरी व जाहीर सेभेमध्ये प्रमुख वक्ता म्हणून विशेष आमंत्रित केले आहे. हि अमरावती जिल्हा, विदर्भ व महाराष्ट्रातील हिंदुत्वासाठी गौरवाची बाब आहे.