LIVE STREAM

Latest NewsMaharashtraSports

विनोदचा मुलगा करतो तरी काय, वडिलांच्या स्वप्नासाठी मेहनत घेतोय १४ वर्षांचा ज्युनिअर कांबळी …

मुंबई :- विनोद कांबळी आता सुधारला आहे. आता कोणासाठी जगायचं, याचं उत्तर त्याला मिळालं आहे. विनादने गेल्या काही दिवसांत एका खास मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की, ‘ मी दारु सोडली आहे आणि आता मला मुलांसाठी जगायचं आहे.’ विनोदला दोन मुलं आहेत. एक मुलगा आणि एक मुलगी. यामध्ये मुलगा मोठा आहे, ज्याबद्दल विनोद फार बोलतो. पण विनोद कांबळीचा हा मुलगा करतो तरी काय, हे त्यानेच या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

विनोदच्या मुलाचा जन्म कधी झाला..

विनोद कांबळीचे अँड्रीया हेविटबरोबर लग्न झालं. विनोदचं हे दुसरं लग्न होतं. पण जून २०१० मध्ये त्यांच्या घरी पाळणा हलला आणि त्यांच्या घरी पूत्ररत्न अवतरलं. विनोदने यापूर्वी आपल्या मुलाचा जास्त उल्लेख कुठेच केला नव्हता. पण सध्याच्या वाईट अवस्थेनंतर जेव्हा विनोदची मुलाखत झाली तेव्हा तो आपल्या मुलाबद्दल मनापासून बोलला.

विनोदला वाईट परिस्थितीमधून काढलं बाहेर..

विनोद हा एक गुणी फलंदाज होता, पण व्यसन आणि फॅशन या दोन गोष्टींमुळे त्याने सर्व काही गमावलं. या गोष्टीचा विनोदचा आता पश्चाताप होतो आहे. पण आता विनोदच्या हातून वेळ निघून गेली आहे. आता काही विनोद मैदानात उतरून खेळू शकत नाही. त्यामुळे विनोद हे स्वप्न आपल्या मुलामध्ये पाहत असावा. विनोदने आपल्या मुलाचा पहिला उल्लेख करताना सांगितले होते की, आज जो मी या वाईट परिस्थितीमधून बाहेर पडलो आहे, त्याचे पहिले कारण हा माझा मुलगा आहे. कारण तो मला म्हणाला होता, तुम्ही या सर्व परिस्थितीमधून बाहेर पडू शकता.

विनोदचा मुलगा नेमकं करतो तरी काय..

विनोदने आपल्या मुलाबद्दल सांगितले होते की, ” माझ्या मुलाचे नाव आहे जीजस ख्रिस्तियानो कांबळी. १४ वर्षांचा आहे. तो उत्तम क्रिकेट खेळतो. तो माझ्यासारखाच डावखुरा फलंदाज आहे. माझ्यासारखीच शैलीदार फटकेबाजी तो करतो. कोणत्याही गोलंदाजाला न घाबरता तो फलंदाजी करतो, हे मी पाहिले आहे. त्यामुळे माझ्या फलंदाजीतला काही अंश त्याच्यामध्ये आहे, असे मला वाटते. तो एक चांगला क्रिकेटपटू व्हावा, हेच माझे स्वप्न आहे आणि तो यासाठी अथक मेहनत घेत आहे. त्यामुळे बघुया की, तो क्रिकेट यापुढे कशापद्धतीने क्रिकेट खेळतो.”

विनोद सध्याच्या घडीला व्यसनांपासून दूर आहे आणि त्याच्यावर काही उपचारही सुरु आहेत. यामधून विनोद कांबळी बाहेर येईल आणि आपल्या मुलाला एक चांगला क्रिकेटपटू बनवेल, अशी आशा बऱ्याच चाहत्यांना आहे. त्यामुळे विनोद कांबळीचा मुलगा भविष्यात कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!