मुंबई गेट वे ऑफ इंडिया कडून एलीफंटा कडे जाणारी बुडाली बोट, अनेक जण बुडाले तर अनेकांचा वाचला जिव
मुंबई :- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची फेरीबोट उरण, कारंजा येथे बुधवारी सायंकाळी उलटली. या दुर्घटने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ६६ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या बोटीत ८० प्रवासी होते. दरम्यान, बोटीतील प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले मदत व बचावकार्य सुरु झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून फेरीबोट एलिफंटा लेण्यांकडे प्रवाशांना घेऊन जात होती. यावेळी ही दुर्घटना घडली. ही नीलकमल नावाची फेरीबोट असून उरण, कारंजा येथे बुडाली. या बोटीत ८० प्रवासी होते. घटनास्थळी नौदल, जेएनपीटी, कोस्ट गार्ड, यलोगेट पोलीस ठाण्याच्या ३ आणि स्थानिक मच्छीमार बोटींच्या सहाय्याने मदत व बचावकार्य चालू आहे. तर या दुर्घटने तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ६६ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.