तीन दिवसीय तायक्वांदो स्पर्धेत वॉरियर तायक्वांदो अकॅडमीचं सुयश

यवतमाळ :- द असोसिएशन फॉर ट्रेडिशनल युथ गेम्स अँड स्पोर्ट्स- इंडिया द्वारा आयोजित तायक्वांदो स्पर्धेत वॉरियर तायक्वांदो अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी. बजावली आहे या तायक्वांदो स्पर्धा दि.13,14,15 डिसेंबरला क्रीडा स्टेडियम यवतमाळ येथे पार पडली. 8 व्या राष्ट्रीय क्रीडा व खेळ 2024 या स्पर्धेमध्ये 14) व 17 वर्ष वयोगटातीळ वॉरियर तायक्वांदो अकॅडमी विद्यार्थ्यांनीतायक्वांदो स्पर्धेत उत्कृष्ट अशी कामगिरी पार पाडून विजय मिळविला.
द असोसिएशन फॉर ट्रेडिशनल युथ गेम्स अँड स्पोर्ट्स- इंडिया द्वारा आयोजित तायक्वांदो स्पर्धा यवतमाळ येथे घेण्यात आला वॉरियर तायक्वांदो अकॅडमीचे विद्यर्थी त्यात वर्ग 9 मधून ओम इंगळे आणि ओम गावंडे यांनी सुवर्णपदक तर हर्षवर्धन दासोडेनं रौप्य पदक मिळविले इंगळे आणि गावंडे यांची इंटरनॅशनल पातळीवर 2025 मध्ये नेपाळ येथे होणाऱ्या स्पर्धेत निवड देखील झाली. अथक परिश्रम करून मिळविलेल्या यशाचे श्रेय ते आपले आई – वडील, स्कूल मॅनेजमेंट आणि तालुका क्रीडा संयोजक (शरद) हिंगणकर व तायक्वांदो प्रशिक्षक अनुप चांदणे, अभय जुनघरे यांना देतात. १४ व १७ वर्ष वयोगटात या स्पर्धा घेण्यात आल्या या यशाबद्दल विजेत्याचं अभिनंदन केलं जातंय.