संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ स्मार्ट हॅकेथॉन स्पर्धा २०२४चं आयोजन
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती अंतर्गत विद्यापीठाच्या इन्क्यूबेशन विभागाच्या वतीने स्मार्ट हॅकेथॉन २०२४ अमरावती विभागीय स्पर्धाघेण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण १३० प्रकल्पांसाठी अमरावती विभागातून ५०० स्पर्धकांनी भाग घेतला या स्पर्धेत .द्वितीय पुरस्कार प्रा . गजानन भारसाकळे यांना अग्रीटेक व फूड या शिर्षकाखाली “लाकडा ऐवजी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या एक पर्यावरण पूरक उर्जा स्तोत्र ” या संशोधना करीतादेण्यात आलाय या स्पर्धेसाठी विभागाद्वारे गठीत स्पर्धा मूल्यांकन कमेटीने निवड केलेल्या आठ स्पर्धकांना उत्तेजनार्थ पुरस्कारांनी गौरविण्यात आलंय .
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत विद्यापीठाच्या इन्क्यूबेशन विभागाच्या वतीने स्मार्ट हॅकेथॉन २०२४ अमरावती विभागीय स्पर्धा घेण्यात आली विद्यापीठ इन्क्यूबीशन विभागा द्वारे प्रस्तावित कंपनी निर्माण व स्टार्ट अप फंडासाठी मूल्यांकन समिती द्वारे पहिल्या तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली . यामध्ये प्रथम पुरस्कार वेदांत भेंडकर यांना “बोन लिंक ” संशोधनासाठी , द्वितीय पुरस्कार प्रा.गजानन भारसाकळे यांना अग्रीटेक व फूड या शिर्षकाखाली “लाकडा ऐवजी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या एक पर्यावरण पूरक उर्जा स्तोत्र ” या संशोधना करीता तथा तृतीय पुरस्कार अभिषेक मोडक व अर्जुन माहोरे यांना “ड्रोन ॲविक्स ” या संशोधनाकरीता पुरस्कार देण्यात आलाय – अकोला येथील शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात सिव्हील इंजिनिअरींग विभागात कार्यरत प्रा. गजानन भारसाकळे यांनी दर्यापूर तालुक्यातील माहुली ( धांडे ) परिसरात स्वतः स्थापन केलेल्या गोरक्षण संस्था स्थळावर गाईच्या शेणात गोमूत्र , सहज उपलब्ध दोन नैसर्गिक वनस्पती व इतर दोन घटक वापरून हे संशोधन कार्य केलंय . कुलगुरु डॉ मिलिंद बारहाते विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ रविंद्र कडू , कुलसचिव डॉ अविनाश असनारे माजी प्र – कुलगुरु डॉ प्रसाद वाडेगावकर इन्क्युबेशन विभागाच्या विभाग प्रमुख डॉ स्वाती शेरेकर आदींनी त्याच्या संशोधनाविषयी जाणून घेतलं.