जनसंघर्ष अर्बन निधी लि शाखेच्या संचालकांवर गुन्हे दाखल
जनसंघर्ष अर्बन निधी लि शाखा बंद असल्याने खातेदारांच्या छातीची धडधड वाढली अफरातफरीच्या चर्चेला उधाण आले . प्रणित मोरे सह इतर संचालकांनी कोट्यवधी रुपये घेऊन फरार झाल्याची चर्चा होती. याबाबत संचालकांकडून कुठलाही खुलासा न मिळाल्याने अनेक ठेवीदार,खातेदारांनी पोलीस स्टेशन गाठले. अनेक तक्रारी दाखल झाल्या, सदर प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी खातेदारांचा दबाव वाढत होता. अखेर पोलिसांनी चौकशी अंति जन संघर्ष अर्बन निधीच्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आलेत.
जन संघर्ष अर्बन निधी लिमिटेड दिग्रस च्या संचालक मंडळांनी ठेवीदारांना १२ टक्के व्याजदर तसेच एक ग्राम सोन्याचा शिक्का असे अनेक प्रलोभने दाखवून ठेवीदारांना आकर्षित करून वेगवेगळे आमिश दाखवून करोडो रुपयांची ठेवी जमा केल्या होत्या. ९ डिसेंबर २०२४ रोजी जन संघर्ष अर्बन निथी लिमिटेड कंपनीच्या अनेक शाखा बंद झाल्याने, जनसंघर्ष बुडल्याची चर्चा होती, त्यात सर्व संचालक फरार होते. त्यामुळे काही ठेवीदारांनी दिग्रस व पुसद पोलीस स्टेशनला तक्रारी दाखल केल्या आहेत याप्रकरणी पोलिसांनी मोरेसह सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केली आहे.