परभणी प्रकरणाचा क्रांती सेनेच्या वतीने निषेध

अमरावती :- १० डिसेंबर रोजी परभणी येथे झालेल्या सविधान विटंबना प्रकरणात आता अमरावती शहरांमध्ये आंबेडकरी संघटना चांगलाच आक्रमक झालेल्या दिसून येत आहे शुक्रवार 20 डिसेंबर रोजी क्रांती सेनेच्या वतीने इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा करण्यात आला मोर्चाच्या माध्यमातून विविध मागण्या मांडण्यात आल्या .
अमरावती मध्ये क्रांती सेनेच्या वतीने इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला परभणी येथील पोलिसांच्या कॉम्बिन ऑपरेशन आणि एकूण सर्व प्रकारची न्यायालयीन चौकशी व्हावी , न्यायालयीन चौकशी ही सेवानिवृत्त न्यायाधीशाकडून न करता सीटिंग न्यायधीशांमार्फत करावी.
पोलीस निरीक्षक अशोक गोरबांड सह इतर पोलीस अधिकाऱ्यांवर कलम 32 अन्वये ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात यावे . अशा अनेक मागण्या साठी क्रांतीसेनेच्या वतीने इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला यावेळी अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष रितेश तेल्मोरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला.