बडनेरा येथे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी महोत्सव स्वच्छता मोहीम राबवून विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आला.
बडनेरा :- बडनेरा येथील एस्सेल आयटीआय महाविद्यालयाकडून संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वच्छता अभियान राबवून पुण्यतिथी साजरी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून बडनेरा पोलीस स्टेशनमध्ये स्वच्छता रॅलीची सांगता करण्यात आली याप्रसंगी एस एल महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री लांडे, प्राचार्य भुषण दहीकर प्रा. अमोल मिलखे सह प्राध्यापक वर्ग.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण .तसेच मनपा स्वच्छता विभाग कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते . तसेच राजेश्वरी विद्यालयात कर्मयोगी संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांनी स्वच्छता दिंडी काढली.व विद्यार्थी प्रभात साठवणे याने संत गाडगेबाबा वेशभूषेत किर्तनाचे सादरीकरण केले.मुख्याद्यापीका निरजा खिरवडकर, उपमुख्याध्यापक सत्येन राघोर्ते, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे अध्यक्ष पर्यवेक्षिका निता गहेरवाल तर प्रमुख अतिथी म्हणून मनीषा राऊत प्रमुख वक्ते सुधीर पांडे आदी उपस्थित होते संत गाडगेबाबाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ शिक्षक संदीप आंबेडकर मोहन खानंदे रामजी राठोड कृपया लाडोले लखन रघुवंशी यांच्या संकल्पनेतून टाळ मृदुंग झेंडे पताका घेऊन वारकरी दिंडी काढून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.