डॉ आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर त्रिशूल !

अचलपुर :- अमरावती जिल्ह्यातील अचलपुर येथील बुंदेलपुरा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अज्ञात समाजकंटाकांनी मोठं मोठे त्रिशूल रोवलेत . शनिवारी सकाळी बौद्ध समाजाच्या नागरिकांना ही घटना दिसली येथे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली .तेथील एका भीमसैनिकाने सिटी न्यूजला हि माहिती दिली आहे याची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अमरावती जिल्ह्यातील अचलपुर येथील बुंदेलपुरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर अज्ञात समाजकंटाकांनी मोठं मोठे त्रिशूल उभा केले. सकाळी बौद्ध समाजाच्या नागरिकांना ही घटना दिसली . राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडावी, दंगली घडाव्यात या उद्देशाने ही विटंबणा झालेली आहे. असं तेथील भीमसैनिकाचं म्हणणं आहे त्यांनी सिटी न्यूजला हि माहिती दिली आहे मी तेथील भीमसैनिकांना बोललो आहे. हे त्रिशूल काढून टाकण्याचे आवाहन करून त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावून सुरक्षितता करण्यात यावी. पोलिसांनी तात्काळ दखल घ्यावी हे कोण लोक आहेत? त्यांचा मास्टरमाईंड कोण आहे ? याची चौकशी झाली पाहिजे. आरोपीना अटक झाली पाहिजे. अशी मागणी करण्यात आली आहे .
गेल्या काही दिवसांपासून डॉ आंबेडकरांविषयी वादग्रस्त विधानं केल्याच्या आरोपावरून आंदोलनं करण्यात आली. या आंदोलनांनी अमरावती चांगलीच ढवळून निघाली तो विषय संपतो न संपतो तोच आता तणाव पसरवणारी हि कृती समाजकंटकांनी केलीय.