Maharashtra
मुंबईत राज ठाकरे-उद्धव ठाकरे भाच्याच्या लग्नाला,आदित्य-अमित ठाकरेही एकत्र,
मुंबईतील दादरमधील राजे शिवाजी विद्यालयात लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी लग्नाला राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे सहकुटुंब उपस्थित राहिले. लग्नात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळाले. तसेच दोघांमध्ये काही संवाद देखील झाला. नुकतीच राज ठाकरेंनी रश्मी ठाकरेंच्या भाच्याच्या लग्नाला हजेरी लावली होती. लग्न सोहळ्यानिमित्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण कुटुंब एकत्र पाहायला मिळाले. यावेळी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, रश्मी ठाकरे देखील उपस्थित होते.