प्रॉपर्टी डीलरच्या कार्यालयात चोरी ५८ हजार रुपयांची रक्कम लंपास

अमरावती :- अमरावतीच्या भुतेश्वर चौक येथील देशपांडे वाडी मध्ये राहणारे सूर्यकांत नारायणदास गुप्ता यांच्या प्रॉपर्टी डीलर कार्यालयात मंगळवार २४ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी चोरी केली. कार्यालयात घुसून लॉकरमधून अंदाजे ५८ हजार रुपयांची रक्कम या चोरट्यानि चोरली. सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता या फुटेजमध्ये तीन चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत, अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचे हे चोरटे वाटत आहेत. ही टोळी या परिसरात मागील काही दिवसांपासून अशाच प्रकारच्या चोऱ्या करत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. चोरांचा शोध घेण्यासाठी फिंगरप्रिंट आणि इतर तपास पद्धतींचा वापर केला जात आहे. पोलिस प्रशासनाने लवकरच आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिले आहे. या चोरीने परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.