सुकळीवासियांची खोलापुरी गेट पोलीस ठाण्याला धडक

अमरावती :- रसूलपूर सुकळी गावातील महिला पुरुषांनी खोलापुरी गेट पोलीस स्टेशनवर धडक दिली. पोलीस पाटील विजय खरड ग्रामपंचायत सदस्य आशिष लोणारे यांच्यासह गावातील लोक पोलीस स्टेशनवर धडकले. सुकळीच्या E क्लास जागेवर परप्रांतीय अतिक्रमण करून राहत असून गावातील लोकांना शिवीगाळ करत असल्याची तक्रार नागरिकांनी दाखल केली.
सुकळी रसूलपूर ग्रामवासियांनी खोलापुरी गेट पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार करण्यासाठी मोठ्या संख्येनं सुकळी रहिवासी पोलीस ठाण्यावर धडकले. सुकळीच्या E क्लास जागेवर परप्रांतीय अतिक्रमण करून राहत असून गावातील लोकांना शिवीगाळ करत आहेत शिवाय ज्या मैदानावर ते रहात आहेत ते मैदान मुलांचं खेळण्याचं मैदान आहे तेथील अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांनी केली. शांततेच्या मार्गाने हा तिढा सोडवला जावा असं नागरिकांचं म्हणणं आहे.
खेळाची मैदानं बोटावर मोजण्याइतकी उरली आहेत मुलांच्या शारीरिक विकासाकरता खेळ आवश्यक आहे. अशाप्रकारे खेळाचे मैदानं नष्ट होऊ नये शिवाय अतिक्रमणधारकांकडून नागरिकांना त्रास होतोय तो निराळाच. पाहत रहा सिटी न्यूज