Crime NewsLatest NewsNagpur
हुडकेश्वर पोलीस ठाण्यात ३२४ अंतर्गत कारवाई

नागपूर :- मित्राचा वाढदिवस होता म्हणून ५ ते ६ जण ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले. दरम्यान त्याच्यात त्याच्या बाचाबाची झाली . एकजण मध्यस्थी करण्यासाठी गेला असता त्याच्या डोक्यात खुर्ची घातली त्यामुळे तो जखमी झाला नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी या प्रकरणी ३२४ अंतर्गत कारवाई केलीय त्यांचा आपसात वाद होता अशी माहिती आरोपीला सूचनापत्रावर सोडल्याची माहिती हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोळकर यांनी माहिती दिली.
यांनी हि कारवाईची माहिती दिली आहे. ज्या मित्रांमध्ये भांडण झालं ते अपराधी वृत्तीचे नव्हते परंतु युवकांमध्ये सहनशीलतेचा अत्यन्त अभाव आहे असं या घटनेवरून दिसून येतंय. मित्राचा वाढदिवस आनंदात साजरा करणं बाजूलाच राह्यलंय.