अमरावती भातकुली मार्गावरील रेल्वे लाईन बांधकामाचा नागरिकांना त्रास

अमरावती :- महामार्गावर असलेल्या रेल्वे रूळ बांधकामाला सुरुवात केली असताना यात नागरिकांना येजा करिता कोणताच पर्यायी मार्ग न दिल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.या समस्या बाबत येथील स्थानिक नागरिकांनी एक आठवड्यापूर्वी आमच्या सिटी न्यूज कडे संपर्क करून आपली समस्या व्यक्त केली होती.हा वृतांत प्रसारित होताच 22डिसेंबर ला स्थानिक नागरिकांना न्याय देण्याकरिता युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा भाजपा चे माजी नगरसेवक आशिष अतकरे सह शेकडो स्थानिक व्यंकटेश कॉलनी नागरिकांनी बुधवारी रेल्वे फाटक जवळ चक्क रेल्वे रोखून धरली.. या आंदोलनाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे खोलापुरी पोलिसांनी तात्काळ धाव घेतली तर रेल्वे प्रशासन अधिकारी घटना स्थळ गाठले . यावेळी शासन प्रशासन आमने सामने आल्याचे दिसून आले.. सुनील राणा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. रेल्वे प्रशाशन लोकांना कायद्याचं धाक दाखवत आहे..रेल्वे प्रशाशनाने मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर अतिक्रमण केले.असा आरोप सुद्धा सुनील राणा यांनी केला. आधी पर्यायी रस्ता द्या मगच रेल्वे रुळाचे कामाला सुरुवात करा अशी मागणी करण्यात आली पर्यायी रस्ता देण्यात आला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा सुनील राणा यांनी दिला.