अमरावतीतील नामांकित शाळांची शतकपूर्ती

अमरावती :- श्रीमंत दादासाहेब खापर्डे यांनी मुले मुली ना शिक्षणाची सोय असावी यासाठी नूतन विदर्भ शिक्षण संस्थेची स्थापना केली. याअंतर्गत जोग चौकात मुलींसाठी नूतन कन्या शाळा व मुलांसाठी न्यू हायस्कुल मेन शाळा स्थापन करण्यात आली. या शाळांनी शतकपूर्ती केली आहे नूतन कन्या शाळेच्या वतीने २९ डिसेंबरला शतकपूर्ती वाटचाल स्नेहभेट आयोजित करण्यात आली आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. न्यू हायस्कूल मेनच्या शतक पूर्तीनिमित्य शताब्दी विशेषांकाचं विमोचन केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात येतंय या कार्यक्रमांची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेला आयोजक डॉ. माया शिराळकर, डॉ. सुभाष कसबेकर, पं. किशोर नवसाळकर, . निनाद सोमण, डॉ. अविनाश मोहरील, अनंत निंबोळे, वर्षा जदबंसी, . उल्हास बपोरीकर, . जयश्री पांडे, . वल्लरी ठीपसे . शिवा पिंपळकर आदी उपस्थित होते.