न्यू हायस्कूल मेनच्या शताब्दी वर्ष समरोपीय समरोहाचे आयोजन,दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली…

अमरावती :- नूतन विदर्भ शिक्षण मंडळ द्वारा संचालित न्यू हायस्कूल मेन चा शताब्दी वर्ष समरोपीय समारोहाचे आयोजन करण्यात आल होत . या कार्यक्रमासाठी केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी तसेच बऱ्याच राजकीय न नेत्याना आमंत्रित करण्यात आल होत. मात्र कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले, त्यामुळे राजकीय नेत्यांचे दौरे रद्द झाले आणि देशभरात सात दिवसांचा शोकवाडा जाहीर करण्यात आला, न्यू हायस्कूल मेनच्या शताब्दी वर्ष समारंभाचे स्वरूप बदलण्यात आले.
नूतन विदर्भ शिक्षण मंडळ द्वारा संचालित न्यू हायस्कूल मेन येथे 27 डिसेंबर 2024 रोजी शताब्दी वर्ष समरोपीय समारोह आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती राहणार होती, तसेच अनेक राजकीय नेत्यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, 26 डिसेंबर 2024 च्या रात्री देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दुःखद निधन झाले, आणि देशभरात सात दिवसांचा शोकवाडा जाहीर करण्यात आला. या कारणामुळे उपस्थिती असलेल्या सर्व राजकीय नेत्यांनी कार्यक्रम स्थगित केले.
त्यानुसार, न्यू हायस्कूल मेनच्या शताब्दी वर्ष समारंभाचे स्वरूप बदलण्यात आले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिमा ठेवण्यात आली, आणि संस्थेचे सचिव निनाद सोमन यांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या बद्दल थोडक्यात माहिती महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश मोहरील यांनी दिली. कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेप्रतीच्या आपल्या भावना व्यक्त करून या समारंभात सहभाग घेतला.
कार्यक्रमात दिनेश सूर्यवंशी, रवींद्र खांडेकर, संजय तीरतकर, आनंद निंबोडे, वर्षा यादव, उपेंद्र पुरीकर, अतुल बिजागरे तसेच संस्थेचे सचिव निनाद सोमन, न्यू हायस्कूल मेन, नूतन कन्या शाळा, न्यू हायस्कूल मेन बेलपुरा या तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, महिला महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.