अमरावतीच्या सिद्धांत खडसेची राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड

अमरावती :- अमरावती नगरीला क्रीडा क्षेत्राचा समृद्ध असा वारसा लाभलाय अनेक खेळाडूंनी अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय यामध्ये सिद्धांत खडसे यानं आपलं नाव नोंदवलंय अमरावतीच्या सिद्धांत खडसेची राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झालीय. राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या चमूत अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालया मध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सिद्धांत संजय खडसे याची निवड झाल्याने अमरावतीच्या खेळाडूंचा आत्मविश्वास द्विगुणित झालाय
राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या शालेय क्रिकेट स्पर्धेकरिता महाराष्ट्राच्या चमूत अमरावतीच्या श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालया मध्ये बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सिद्धांत संजय खडसे याची निवड झाल्याने अमरावतीच्या खेळाडूंमध्ये चैतन्याची लहर निर्माण झाली आहे. ज्ञानमाता हायस्कूल मध्ये पाचव्या वर्गापासून सिद्धांत क्रिकेटचे धडे घेत असून त्याने अनेक स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. शालेय स्तरावरील जिल्हा आणी विभागीय पातळीवरही सिद्धांतने क्रिकेटच्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी चे वैयक्तिक पारितोषिकही त्याने प्राप्त केले आहे.
हिंगणघाट , वर्धा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट निवड प्रक्रियेत सिद्धांत खडसे अमरावती विभागातून सहभागी झाला होता. या निवड प्रक्रियेत सिद्धांतसह यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती या जिल्ह्यातून पाच विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते. सिद्धांतने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याने अमरावती विभागातून सिद्धांत खडसे यांची निवड करण्यात आली.
सिद्धांत खडसे गेल्या दोन वर्षापासून श्री क्रिकेट अकादमी, वलगाव रोड, अमरावती येथे श्री संकेत निंभोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेत आहे. सिद्धांत संजय खडसे याने वयाच्या १७ व्या वर्षी मिळविलेल्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्याचा नुकताच श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जी.व्ही.कोरपे, क्रीडाशिक्षक प्रा.विश्वास जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख प्रा. शैलेंद्र दांडगे, प्रा. रणजीत हुतके,प्रा.निशिकांत निस्ताने, शारीरिक शिक्षण संचालक डॉ.रूपाली इंगोले,प्रा.डाॅ. अविनाश जुमळे आदींनी सत्कार केला आहे.
सिद्धांत संजय खडसे यांना मिळालेल्या या यशाबद्दल त्याचे विविध स्तरातून अभिनंदन होतं आहे.त्याच्या यशस्वीते बद्दल सिद्धांत चे वडील प्रा, संजय खडसे यांनी आमच्या सिटी न्यूज जवळ आपली प्रतिक्रिया व्यक्त केली . कोणतंही उच्चतम स्थान मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागतात मग ते क्रीडा क्षेत्रातील असो किंवा अभ्यासातील नुकताच करीना थापाने पुरस्कार मिळवून अमरावतीची मान उंचावली आहे आता सिद्धांत खडसेंच्या त्यामध्ये भर घातली आहे. दोघांचेही क्षेत्र वेगळं आहे परंतु दोघांनीही अमरावतीच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवलाय.