LIVE STREAM

India NewsLatest News

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा दुखवटा जाहीर

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी रात्री नवी दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णायामध्ये वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर शनिवारी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी नवी दिल्लीमध्ये संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झालेत. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असून सात दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

भारताच्या आर्थिक विकासात मोलाची भूमिका बाजवणारे, भारत देशाचे दोन वेळा पंतप्रधान पद भूषवनारे डॉ. मनमोहन सिंग यांचे 26 डिसेंबरच्या रात्री 8 वाजता दिल्लीमधील ‘एम्स’ रुग्णालयामध्ये निधन झाले. १९८२ ते १९८५ या काळात डॉ. मनमोहन सिंग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते. या काळात त्यांनी बँकिंग क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या. १९९१ पासून डॉ. मनमोहन सिंग यांच्या संसदीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती, याच दरम्यान त्यांनी देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 दरम्यान भारताचे पंतप्रधान आणि अर्थतज्ञ देखील होते. त्यांनी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणं स्वीकारली. या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था जागतिक बाजारपेठेसाठी खुली झाली. यामुळे खाजगी क्षेत्राला प्रोत्साहन मिळालं आणि त्याशिवाय परदेशी गुंतवणूकदेखील आकर्षित झाली. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ झाली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या अनेक धोरणांमुळे भारताला मोठा फायदा होत देशाची प्रगती झाली. भारताच्या आर्थिक विकासामध्ये मोलाचा हातभार लावणाऱ्या मनमोहन सिंग यांनी 2014 साली सक्रीय राजकारणामधून निवृत्ती घेतली. ते सध्या राज्यसभेचे खासदार होते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही काळापासून त्यांना वयोमानानुसार प्रकृतीसंदर्भातील समस्या जाणवत होत्या. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मनमोहन सिंग यांची तब्येत खालावल्याने त्यांना गुरुवारी संध्याकाळी एम्समधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण देशात शोककळा पसरली, अनेक नेते, तसंच दिग्गजांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली.

डॉ. महमोहन सिंग यांच्या योगदानासाठी त्यांना पद्मविभूषणसह अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. १९९१ मध्ये पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांनी उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणाची धोरणं राबवून भारतीय अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली होती. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांनी आज सुट्टी जाहीर केली आणि त्यांना श्रद्धांजलि अर्पण केली. सिटी न्यूज परिवाराच्या वतीने या थोर अर्थतज्ञाला विनम्र अभिवादन.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!